अस्वीकरण

राज्यामधील युवक/युवतींना राज्यात योग्य रोजगार मिळावा ह्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने Balasahebthackerayrojgarmelava.com ची सुरुवात केली आहे.

Balasahebthackerayrojgarmelava.com रोजगार मेळाव्याच्या पुढाकारामुळे नियोक्ते, काम शोधणारे आणि अन्य संबंधित समान मंचावर येतील आणि प्रतिष्ठित नियोक्ते आणि उमेदवार ह्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती होतील.

कोणत्याही नियोक्त्याबाबत विशिष्ट शिफारस करीत नाही. काम शोधणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या प्रस्तावाकरिता अर्ज करताना किंवा नोकरी स्वीकारताना नियोक्त्याची माहिती शोधण्यात योग्य काळजी घेण्यास प्रोत्साहन दिले जाते.

नियोक्ते आणि नोकरी उत्सुक उमेदवार/अर्जदात्यांना एकमेकांकडून पात्रता, प्रमाण व एकूण माहितीचा संदर्भ घेण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते.

येथील माहिती शक्य तितकी अचूक राखण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही उपभोक्ता/नोकरी उत्सुक उमेदवारांना येथे पोस्ट केलेल्या माहितीच्या वापराबाबत योग्य ती काळजी घेण्याचे व विवेकपूर्ण विचार करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Balasahebthackerayrojgarmelava.com हे केवळ सुविधा देते व संबंधित प्रधिकरणाला येथे दिलेल्या माहितीच्या दुरुपयोगाकरिता जबाबदार धरले जाणार नाही. येथून पुरविल्या गेलेल्या माहिती किंवा सेवांसंदर्भात कोणाही संबंधितास कोणतीही हानी वा नुकसान झाल्यास उद्योग मंत्रालय, मराऔविमं किंवा महाराष्ट्र शासनाचा अन्य विभाग जबाबदार नसेल.

ह्या संकेतस्थळावर रोजगाराकरिता नोंदणी केल्यास आपण कामाच्या गोपनियता धोरणाच्या अटी मान्य असल्याचे आणि वर स्पष्ट केलेल्या उद्देशाकरिता आपली वैयक्तिक माहिती उद्योग मंत्रालय, मराऔविमं ला प्रक्रिया करण्याकरिता संमती देत आहात.

 

गोपनीयता धोरण

हे संकेतस्थळ आपल्याकडून कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती हस्तगत करीत नाही, जी आपल्याला वैयक्तिकरित्या ओळखण्यास मदत करते, (जसे नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल).

जेव्हा हे संकेतस्थळ आपल्याला वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती करते, तेव्हा ही माहिती विशिष्ट कारणाकरिता जमविली जाते ह्याची आपल्याला सूचना मिळेल व आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्याकरिता पुरेसे सुरक्षा उपाय केले जातील. आपण ह्या संकेतस्थळावर स्वेच्छेने पुरविलेली वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीची आम्ही विक्री करीत नाही किंवा ती सामायिक करीत नाही. तथापि, कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (सीआयआय), जे आमचे मुख्य भागीदार आहेत, ते रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या कारणाकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्याकरिता वरील माहिती वापरु शकतील.

ह्या संकेतस्थळावर पुरविलेली कोणतीही माहिती हानी, गैरवापर, अनधिकृत वापर किंवा प्रकटीकरण, फेरबदल किंवा विनाश ह्यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही उपभोक्त्यांबाबत – इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ते, डोमेन नाव, ब्रावझर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टीम, भेटीचा दिनांक व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे ह्याबाबत विशिष्ट माहिती गोळा करतो.

ह्या साईटचे नुकसान करण्याचा प्रयत्न न केल्यास आम्ही आमच्या साईटला भेट देणाऱ्यांची ओळख जाणण्याचा प्रयत्न करणार नाही.

Balasahebthackerayrojgarmelava.com चा वापर करणार्यांनी कृपया लक्षात ठेवावे की हे केवळ वास्तविक रिक्त जागांवरील नियुक्तीकरिता आणि अन्य व्यवसाय वृद्धी सेवांसंदर्भात उपभोक्ते / सदस्य / भेटकर्ते ह्यांना प्रामाणिक संपर्क मिळण्याकरिता / भविष्यात प्रदान करण्याकरिता संपर्क आणि माहितीचे आदान-प्रदान करण्याचे एका प्राथमिक माध्यमाची सेवा देत आहे. Balasahebthackerayrojgarmelava.com हा ग्राहकांना रोजगार प्रदान करण्याचा किंवा त्यासाठी हमी देण्याचा व्यवसाय नाही आहे.